कवळे येथे जलवाहिनी फुटल्याने काही भागातील जलपुरवठा ठप्प

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
32 mins ago
कवळे येथे जलवाहिनी फुटल्याने काही भागातील जलपुरवठा ठप्प

फोंडा :  कवळेच्या मलनिस्सारण प्रकल्पाजवळ सोमवारी संध्याकाळी जेसीबी (JCB) मशीनचा (Machine) धक्का बसल्याने  २०० एमएमची जलवाहिनी (Water Pipeline) फुटली. त्यामुळे खडपाबांध व कवळे पंचायत (Kavlem Panchayat) क्षेत्रातील काही भागात पाणीपुरवठा ठप्प झाला.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (PWD) कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सोमवारी संध्याकाळी परिसरात जेसीबी मशीनद्वारे काम सुरू असताना अचानक पाण्याच्या वाहिनीला धक्का बसल्याने वाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेले.

बांधकाम खात्याच्या कार्यालयात माहिती दिल्यानंतर त्वरित वाहिनीतून पाणी पुरवठा बंद करण्यात आला. मंगळवारी सकाळपासून बांधकाम खात्याच्या कर्मचाऱ्यांनी सहायक अभियंता काशिनाथ सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्तीच्या कामाला सुरूवात केली. संध्याकाळी उशिरा पर्यंत खडपाबांध व कवळे भागातील लोकांसाठी पाणी पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


हेही वाचा