
वास्को : होळी खेळत असताना नळाला धातूचा पाईप जोडण्याचा प्रयत्न करताना पाईपचा संपर्क उच्च दाबाच्या वीजवाहिनीशी आल्याने वीजेच्या धक्क्याने झुआरीनगर येथील दिलीप गौड (२७) याचा जागीच मृत्यू झाला. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तरप्रदेशीय रहिवाशांनी दि. ४ रोजी होळी साजरी केली. बिर्ला झुआरीनगर येथे राहणारा दिलीप गौड याच्या निवासस्थानीही आसपासचे रहिवाशी होळी खेळत होते. दुपार झाल्याने दिलीप होळी खेळत असताना तेथील साडेसहा मीटर लांबीचा धातूचा पाईप उचलून नळाला जोडण्याचा प्रयत्न करू लागला. तेथून उच्च दाबाच्या वीजवाहिन्या गेल्या आहेत. पाईप वर उचलताना त्या पाईपाचा त्या उच्च दाबाच्या वीजवाहिन्यांशी संपर्क आला. त्यामुळे त्याला विजेचा जोरदार झटका बसल्याने तो जागीच मरण पावला. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.