कळंगुट येथे पर्यटकांच्या कारची धडक बसून ट्रान्सफॉर्मरला आग; वीज पुरठा खंडित

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
कळंगुट येथे पर्यटकांच्या कारची धडक बसून ट्रान्सफॉर्मरला आग; वीज पुरठा खंडित

पणजी : कळंगुट (Calangute) येथे पर्यटकांच्या (Tourist) कारची धडक बसल्यानंतर वीज ट्रान्सफॉर्मरला आग लागली. या अपघातात (Accident) कारमधील एक पर्यटक जखमी झाला.  वीज ट्रान्सफॉर्मर (Electricity Transformer) आगीत जळून खाक झाला असून, परिसरातील वीज पुरठवा खंडित झाला आहे. 

गुजरातमधील पर्यटक कारने कळंगुटहून कांदोळीच्या दिशेने जात होते. त्यावेळी रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवलेल्या एका गाडीला कारची धडक बसली. त्यानंतर वीज ट्रान्सफॉर्मरला धडक बसली. धडक बसल्यानंतर ट्रान्सफॉर्मरने पेट घेतला व आगीत जळून खाक झाला. पर्यटकांच्या कारमध्ये चारजण होते. त्यातील एकटा जखमी झाला. 

दरम्यान, वीज खात्याने खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. संध्याकाळी पर्यंत वीज पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तवली आहे.