मुरगाव नगरपालिका घेणार कोळसा हाताळणी बंद करण्यासंदर्भात ठराव

मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
मुरगाव नगरपालिका घेणार कोळसा हाताळणी बंद करण्यासंदर्भात ठराव

वास्को : मुरगाव (Mormugao ) नगरपालिका क्षेत्रातील कोळसा हाताळणी (coal handling) बंद करावी, असा ठराव घेण्याचा निर्णय मुरगाव नगरपालिका मंडळाने घेतला आहे. आमदार संकल्प आमोणकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासोबत संयुक्त बैठक बोलावण्याची मागणीही नगरसेवकांनी (Councillors ) केली. 

कोळसा प्रदूषणासंदर्भात मुरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष (MMC Chairperson) गिरीश बोरकर यांनी बोलावलेल्या विशेष संयुक्त बैठकीला कोळसा हाताळणी करणारे युनिट, आमदार, एमपीए उपस्थित राहिले नाहीत. 

आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले की, कोळसा हाताळणी थांबवण्यासाठी ‘रोड मॅप’ तयार करण्याची गरज आहे. भावी पिढीच्या चांगल्या आरोग्यासाठी कोळसा बंद करावा; असे आमदार आमोणकर म्हणाले. यापुढे येणारी नगरपालिका निवडणूक, विधानसभा निवडणुकीपूर्वी कोळशावर राजकीय स्टंट करू नये, असे आवाहन आमदार आमोणकर यांनी नगरसेवकांना केले. मुरगावातील कोळसा हाताळणी थांबवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन नगरपालिका मंडळाला दिले.