‘सरकार तुमच्या दारी’ सरकारचा नव्हे, भाजपचा उपक्रम : काँग्रेसची टीका

फोंडा पोटनिवडणुकीसाठी सरकारकडून विविध आमिषे : वेरेकर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
07th February, 11:34 pm
‘सरकार तुमच्या दारी’ सरकारचा नव्हे, भाजपचा उपक्रम : काँग्रेसची टीका

फोंडा येथे पत्रकार परिषदेत माहिती देताना राजेश वेरेकर व इतर.      

फोंडा : फोंडा येथे ‘सरकार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम सरकारचा नसून भाजपचा आहे. फोंडा मतदारसंघातील पोटनिवडणूक नजरेसमोर ठेवून भाजपने कार्यक्रमाचे आयोजन करून प्रचाराला सुरुवात केली आहे. लोकांनी सरकारच्या खोट्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन काँग्रेसचे राजेश वेरेकर यांनी शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे.
पत्रकार परिषदेत अॅड. हृदयनाथ शिरोडकर, अॅड. रामदास तेमयेकर व अन्य मान्यवर उपस्थित होते. फोंडा शहरात सिग्नेचर प्रकल्पाचे काम २०१७ पासून सुरू आहे. पण, अजून पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. त्याचबरोबर पार्किंग व्यवस्था व अन्य सुविधांचा अभाव जनतेला सोसावा लागत आहे. ‘सरकार तुमच्या दारी’ कार्यक्रम आयोजित करून जनतेच्या निधीचा गैरवापर सरकारने केला आहे. फोंडा पोटनिवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी भाजप जनतेला विविध आमिषे दाखवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राजेश वेरेकर यांनी केला आहे.
भाजप सरकारकडून निधीचा गैरवापर
अॅड. शिरोडकर यांनी भाजप सरकार जनतेच्या अपेक्षांऐवजी अनेक मोठे कार्यक्रम आयोजित करून निधीचा गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे. होंडा शहरात अायोजित केलेला ‘सरकार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम सपशेल अपयशी ठरला आहे. जनतेची कामे सरकारी कार्यालयात वेळेत होणे गरजेचे आहे. पण, लोकांना आपल्या कामासाठी कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा