जुने गोवे येथे सिलींडर स्फोटात ४२ वर्षीय महिला ठार : गोमेकॉत होते उपचार सुरू

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
जुने गोवे येथे सिलींडर स्फोटात ४२ वर्षीय महिला ठार : गोमेकॉत होते उपचार सुरू

पणजी : गोव्यातील (Goa) जुने गोवे (Old Goa)  येथे सिलींडर स्फोटात (Cylinder Blast) गंभीर जखमी झालेल्या ४२ वर्षीय महिलेचे बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय (गोमेकॉ) (GMC) हॉस्पिटलात उपचार सुरू असताना निधन झाले.

२ फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती. महिला स्वयंपाक घरात पाणी गरम करण्यासाठी गेली होती. त्याच गॅस हाताळताना अचानक सिलींडरचा स्फोट झाला. त्यात महिला गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला गोवा वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना तिचे निधन झाले. महिला जुने गोवे येथे वास्तव्यास होती तर मूळ झारखंड (Jharkhand) येथील आहे. सिलींडर स्फोट होण्यामागचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. 

हेही वाचा