मुरगाव नगरपालिकेच्या उपनगरध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

ठराव अवैध असल्याचा दावा करीत न्यायालयात जाण्याचा समर्थक नगरसेवकांचा इशारा

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
52 mins ago
मुरगाव नगरपालिकेच्या उपनगरध्यक्षाविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

वास्को : मुरगाव नगरपालिकेचे (Mormugao Muncipality)  उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत यांच्याविरोधात दाखल केलेला अविश्वास ठराव १३ मतांनी मंजूर झाला. मात्र, अविश्वास ठराव अवैध असल्याचा दावा करीत कामत यांच्या समर्थक नगरसेवकांनी (Councillor)  न्यायालयात (Court) जाण्याचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी नगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष रामचंद्र कामत यांच्यवरील अविश्वास ठराव १३ मतांन मंजूर झाला. त्यानंतर रामचंद्र कामत यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी  त्याला हरकत घेतली. अविश्वास ठराव मांडण्यासाठी सादर केलेले पत्र कोणत्याही नगरसेवकाच्या नावाने नव्हते व त्यात नमूद केलेले नाव चुकीचे होते. त्यामुळे हा ठराव अवैध असून, बैठक रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. तरीही अविश्वास ठरावावरील बैठक पार पडली. आणि ठराव मंजूर झाल्यामुळे; कामत यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांनी बैठकीनंतर या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. 


हेही वाचा