भारत टॅक्सी ॲपला टॅक्सी चालकांचा तीव्र विरोध

ॲप सेवा टॅक्सीवाल्यांना, गोमंतकीयांना परवडणारी नाही : टॅक्सी मालक संघटना

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
भारत टॅक्सी ॲपला टॅक्सी चालकांचा तीव्र विरोध

पणजी : गोवा माईल्स (Goa Miles), गोंयचो पात्रांव, ॲपला ॲग्रीगेटर आणि आता भारत टॅक्सी (Bharat Taxi App) असे वेगवेगळे उपक्रम टॅक्सी सेवेमध्ये सुरू आहेत. सरकारला टॅक्सी व्यवसाय गोमंतकीयांच्या हातात राहिलेला हवा आहे की नाही? हे सरकारने (Government) स्पष्ट करायला हवे. टॅक्सी ॲप टॅक्सीवाल्यांना तसेच सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने आमचा याला विरोध असेल, असे टॅक्सी मालक (Taxi Owner) संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत यांनी स्पष्ट केले आहे. 

राज्यात कोणता ॲप असावा? याबाबत सरकारमध्येच संभ्रमावस्था आहे. टॅक्सी धोरणाविषयी चर्चा सुरू आहे. मसूदा तयार आहे. मग सरकार धोरण निश्चित करण्यासाठी विलंब का लावते? असा प्रश्न चेतन कामत यांनी केला आहे. भारत टॅक्सी ॲप सेवा कशी असेल? राज्यात कधी सुरू होईल? याबाबत काहीही जाहीर झालेले नाही. याबाबतची अधिसूचना जारी झाली की; बैठक घेऊन त्यावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू. तरीही निश्चीतपणे भारत टॅक्सी ॲपला आमचा विरोध असेल, असे चेतन कामत यांनी सांगितले. सरकारने सर्वप्रथम गोवा माईल्स ॲप सेवा सुरू केली. तद्नंतर ॲप ॲग्रीगेटर धोरणाचा मसूदा आणला. आता भारत टॅक्सी ॲप सुरू होणार आहे. राज्यात किती ॲप सेवा सुरू करायच्या आहेत? परराज्यातील टॅक्सीवाल्यांना राज्यात आणण्याचा हा डाव आहे, असा आरोप चेतन कामत यांनी केला आहे.

हेही वाचा