काकोडा,कुडचडे येथे कार व दोन दुचाकींमध्ये अपघात; दोघेजण जखमी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
काकोडा,कुडचडे येथे कार व दोन दुचाकींमध्ये अपघात; दोघेजण जखमी

पणजी : गोव्यातील (Goa) काकोडा, कुडचडे (Curchorem) येथे कार व दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात दोघेजण जखमी झाले. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला.

यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, एका स्कूटर (Scooter) चालकाची धडक कारला (Car) बसली व खाली कोसळला. स्कूटर चालकाला झोप लागल्यासारखी झाल्याने हा अपघात घडला.  या गडबडीत त्याच्यामागे येत असलेला स्कूटर चालक नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात असताना तोल जाऊन खाली पडला. या अपघातात दोघेजण जखमी झाले. कार चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला. अपघातात स्कूटर व कारची हानी झाली. दरम्यान, वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नियम पाळून वाहने हाकण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 



हेही वाचा