आडपई-दुर्भाटच्या सरपंचपदी अमृता नाईक बिनविरोध

उपसरपंचपदी सद्गुरु गावडे यांची निवड


4 hours ago
आडपई-दुर्भाटच्या सरपंचपदी अमृता नाईक बिनविरोध

दुर्भाटच्या नवनिर्वाचित सरपंच अमृता नाईक, उपसरपंच सद्गुरू गावडे व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
फोंडा : आडपई-दुर्भाटच्या सरपंचपदी अमृता श्रीकांत नाईक यांची, तर उपसरपंच सद्गुरु गावडे यांची शनिवारी सकाळी बिनविरोध निवड करण्यात आली. शनिवारी बैठकीला ७ पैकी फक्त ३ पंच उपस्थित राहिल्याने तो चर्चेचा विषय बनला.
दुर्भाटचे सरपंच चंदन नाईक यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी चार पंचांनी अविश्वास ठराव संमत केला होता. त्यामुळे शनिवारी नवीन सरपंचांची निवड करण्यात आली. मात्र ७ पैकी फक्त तीनच पंचांनी सरपंच व उपसरपंचांची निवड केल्यामुळे तो चर्चेचा विषय बनला. बैठकीला अमृता नाईक, सद्गुरू गावडे व गौरेश नाईक उपस्थित होते. नूतन सरपंच अमृता नाईक म्हणाल्या, स्थानिक आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे पूर्ण करण्याला प्राधान्य दिले जाईल. लोकांनीही विकासकामांना सहकार्य करावे.

हेही वाचा