खासदार फर्नांडिस यांनी बसच्या चाव्या केल्या माजी मंत्री प्रकाश वेळीप यांच्याकडे सुपूर्द

पणजी : गोकुल्डे, केपे (Gokuldem, Quepem) येथील दयानंद बांदोडकर माध्यमिक विद्यालयाला (Dayanand Bandodkar High School) खासदार निधीतून बस पुरवण्यात आली. दक्षिण गोवा जिल्हा खासदार (South Goa Member of Parliament) विरीयातो फर्नांडिस यांनी दयानंद एज्युकेशन सोसायटीचे (Dayanand Education Society) अध्यक्ष तथा माजीमंत्री प्रकाश शं. वेळीप यांच्याकडे या बसच्या चाव्या सुपूर्द केल्या.
यावेळी केपेचे आमदार अॅल्टन डिकॉस्ता, दक्षिण गोवा जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष सावियो डिसिल्वा, स्थानिक पंच सदस्य, माजी पंच सदस्य, शिक्षक, पालक-शिक्षक संघाचे सदस्य, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. नव्या बसमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाला चालना मिळणार असून; शालेय उपक्रमांना गती मिळेल,अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद वेळीप, शाळा व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे, स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि संरक्षण दलात सामील होऊन राष्ट्रसेवा करण्याचे आवाहन कॅ. विरीयातो फर्नांडिस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केले.