बाणावलीत स्वयंअपघात; दुचाकीचालकाचा मृत्यू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25 mins ago
बाणावलीत स्वयंअपघात; दुचाकीचालकाचा मृत्यू

मडगाव: बाणावली येथील मोगाबाय परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या एका स्वयंअपघातात दुचाकीस्वार लुकास मिनिनो फर्नांडिस (४३) यांचा मृत्यू झाला. ते बाणावली येथील पूलवाडो भागातील रहिवासी होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. लुकास फर्नांडिस हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक त्यांचा ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांना एका खासगी वाहनातून मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

सध्या मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या शवागारात ठेवण्यात आला असून कोलवा पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रथमेश महाले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा