पर्यटनवाढीचा लाभ प्रत्येक घटकाला आवश्यक : मंत्री खंवटे

मडगावातील फूड अँड कल्चरल महोत्सवाचे उद्घाटन


59 mins ago
पर्यटनवाढीचा लाभ प्रत्येक घटकाला आवश्यक : मंत्री खंवटे

फूड अँड कल्चरल महोत्सवाचे उद्घाटन करताना पर्यटनमंत्री रोहन खंवटे, सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत, आमदार उल्हास तुयेकर, आमदार केदार नाईक व इतर.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : अर्थव्यवस्था, पर्यावरण व समाज या गोष्टी डोळ्यांसमोर ठेवून पर्यटन धोरणाची निर्मिती करण्यात आली. पर्यटनाचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवावा, पर्यटन वाढावे यासाठी पर्यटन खात्याकडून प्रयत्न केले जात आहेत. या महोत्सवात गोमंतकीय कलाकारांच्या कलांचे सादरीकरण व गोमंतकीय खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले जात आहे, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
मडगाव येथील राजेंद्रप्रसाद स्टेडियमवर फूड अँड कल्चरल महोत्सवाचे उद्घाटन मंत्री खंवटे व सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक, आमदार उल्हास तुयेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, कुलदीप आरोलकर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. या महोत्सवावेळी विविध क्षेत्रातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला.
गेल्यावर्षी फूड अँड कल्चरल महोत्सवाला गर्दी झाली होती. त्यानुसार दुसर्‍यावर्षी पर्यटन खात्याकडून हा महोत्सव केला जात आहे. गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीकोनातून पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. राज्याची अर्थव्यवस्था काही प्रमाणात पर्यटनावर अवलंबून आहे. पर्यटनातून अर्थव्यवस्था आणखी मजबूत होण्यासाठी पर्यटन खाते कार्यरत आहे. गोव्यात पर्यटनात वाढ होत असतानाही काहीजणांकडून नाहक पर्यटनात घट झाल्याच्या अफवा पसरवण्यात येतात, असेही मंत्री दिगंबर कामत म्हणाले.

हेही वाचा