श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा जत्रोत्सव ३० पासून

विविध कार्यक्रमांचे आयोजन : ३१ रोजी बहुउद्देशी सभागृहाची पायाभरणी


2 hours ago
श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा जत्रोत्सव ३० पासून

पत्रकार परिषदेत माहिती देताना अध्यक्ष उदय देसाई. सोबत पंकज देसाई, बाबू देसाई आणि दिलीप देसाई.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : येथील श्री शांतादुर्गा किटलकरीण देवस्थानचा जत्रोत्सव ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत साजरा केला जाणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या उत्सवात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती अध्यक्ष उदय देसाई यांनी दिली.
मंदिरात आयोजित पत्रकार परिषदेत जत्रोत्सवाबाबत माहिती देण्यात आली. यावेळी अध्यक्ष देसाई यांच्यासह सरचिटणीस पंकज देसाई, खजिनदार बाबू देसाई, मुखत्यार दिलीप देसाई उपस्थित होते. ३० जानेवारीला सकाळी धार्मिक विधी, महापूजा व प्रसाद होईल. रात्री ९.३० वा. ‘श्रीं’ची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात येईल. १० वा. सिंहरथातून भव्य मिरवणूक काढली जाईल. त्यानंतर आरती, तीर्थप्रसाद होईल. रात्री १०.३० वा. श्री नागेश महारुद्र, नागेशी बांदोडे निर्मित प्रशांत सतरकर प्रस्तुत ‘रंग रंगी सतरंगी’ हे कोकणी विनोदी नाटक सादर होईल.
रविवार, १ फेब्रुवारी रोजी पूजा, आरती, महाअभिषेक, आरती आणि महाप्रसाद होईल. रात्री ‘दि रॉकर्स’ बॉलिवूड बँडचा ऑर्केस्ट्रा होईल. रात्री १२.३० वा. पालखी शिबिकोत्सव आणि रात्री १ वा. ‘श्रीं’ची महारथातून भव्य मिरवणूक काढून उत्सवाची सांगता होईल. उत्सवाच्या तिन्ही दिवशी दुपारी आणि रात्री महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे. भक्तांनी या मंगल कार्यास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष उदय शंकर ना. देसाई आणि समिती सदस्यांनी केले आहे.
शनिवारी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ कोकणी नाटक
शनिवार, ३१ जानेवारी रोजी नवचंडी वाचन, पूर्णाहुती, दुपारी १२.१५ वा. बहुउद्देशी सभागृहाची पायाभरणी केली जाईल. त्यानंतर महापूजा, आरती आणि महाप्रसाद होईल. रात्री १० वाजता ‘श्रीं’ची विजयरथातून मिरवणूक निघेल. रात्री १०.३० वा. कला चेतना वळवई निर्मित, श्रीबांका क्रिएशन नागेशी बांदोडा प्रस्तुत ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ हे दोन अंकी कोकणी नाटक सादर होईल.       

हेही वाचा