वेदांता सेसा गोव्याचा सामाजिक बांधिलकीचा पुनरुच्चार

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
पणजी : राष्ट्रीय बालिका दिन आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने वेदांता सेसा गोवाने शिक्षण, कौशल्य विकास आणि सक्षमीकरणाच्या माध्यमातून सर्वसमावेशक विकासाचा ठाम संकल्प पुन्हा अधोरेखित केला. ग्रामीण व वंचित भागातील जीवनात परिवर्तन घडवून आणणाऱ्या उपक्रमांद्वारे कंपनी राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान देत आहे.
कंपनीचा प्रमुख सामाजिक उपक्रम ‘प्रोजेक्ट वृद्धी’ शिक्षण क्षेत्रातील प्रभावी आधारस्तंभ ठरला आहे. दुर्गम भागांत शिक्षणाला चालना देताना बालिकांच्या शिक्षणावर विशेष भर देण्यात येतो. ‘वेदांता उत्कर्ष शिष्यवृत्ती’अंतर्गत २०१८ पासून दहावीपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंत १,३००हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांना लाभ झाला असून त्यात सुमारे ५० टक्के लाभार्थी मुली आहेत. गोव्याच्या मुळगाव येथील लीला परब, महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधील रिया दत्ताराम नाईक आणि कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील लंचना एम. यांसारख्या विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीमुळे आपली स्वप्ने पूर्ण करता आली.
सर्वसमावेशक शिक्षण आणि संधींच्या माध्यमातून देशाच्या भवितव्याला सक्षम करण्याचा आमचा संकल्प कायम आहे. प्रोजेक्ट वृद्धी, उत्कर्ष शिष्यवृत्ती, सेसा टेक्निकल स्कूल आणि सेसा फुटबॉल अकादमीद्वारे आम्ही युवक व युवतींना त्यांच्या क्षमतेची जाणीव करून देत आहोत.
_ नवीन जाजू, मुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांता सेसा गोवा
सेसा टेक्निकल स्कूलमधून २०००हून अधिक युवकांना प्रशिक्षण
शिक्षणातून रोजगाराकडे नेणाऱ्या उपक्रमांतर्गत साखळी (गोवा) येथील सेसा टेक्निकल स्कूलने आजवर २,०००हून अधिक युवकांना प्रशिक्षण देत जवळपास १०० टक्के रोजगार उपलब्ध करून दिला आहे. डिजिटल साक्षरता, शालेय पायाभूत सुविधा, अंगणवाडी बळकटीकरण आणि क्रीडा क्षेत्रातील प्रोत्साहन या माध्यमांतूनही कंपनीचे योगदान लक्षणीय आहे. या सर्व उपक्रमांतून वेदांता सेसा गोवा केवळ लाभार्थी नव्हे, तर परिवर्तनाचे वाहक म्हणून मुली व ग्रामीण युवकांना सक्षम करत असून समावेशक व शाश्वत भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.