
पणजी : गोवा सरकारच्या (Goa Government) विविध खात्यांमध्ये, महामंडळांमध्ये तसेच सरकारी संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) (EPF) योजनेचा लाभ मिळणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षिततेला मोठे बळ मिळाले आहे.
राज्यातील कृषी (Agriculture), शिक्षण (Education), आरोग्य (Education), सार्वजनिक बांधकाम (पीडब्ल्यूडी) (PWD) तसेच वीज खात्यांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून, या सर्व कर्मचाऱ्यांना ईपीएफ लागू होणार आहे. दीर्घकाळापासून कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून ईपीएफसारख्या मुलभूत सुविधा देण्याची मागणी होत होती. सरकारच्या या निर्णयामुळे निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असल्याचे मत काही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.
सरकारी खात्यांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असून, त्यांच्या भविष्यातील सुरक्षिततेच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.