कालवांची भजी

Story: चमचमीत रविवार |
17th January, 11:20 pm
कालवांची भजी

साहित्य:

 ​कालवं : १ पेला

 ​​बेसन : पाव किलो

 ​​धणेपूड : १ चमचा

 ​​हळद : पाव चमचा

 ​​तिखट : २ चमचे

 ​​कोकम आगळ : २ चमचे

 ​​हिंग : चिमूटभर

 ​​तेल : तळण्यासाठी

 ​​मीठ : चवीनुसार


कृती:

​१. सर्वप्रथम कालवं नीट स्वच्छ करून धुवून घ्यावीत.

२. एका बाऊलमध्ये बेसन पीठ घेऊन त्यामध्ये धणेपूड, हळद, तिखट, कोकम आगळ, हिंग आणि चवीनुसार मीठ टाकावे.

३. सर्व जिन्नस एकत्र करावेत आणि त्यामध्ये धुतलेली कालवं टाकावीत.

४. कालवं पिठामध्ये नीट मिक्स करून थोडे थोडे पाणी घालत भजीच्या पिठासारखे मिश्रण तयार करावे.

५. पॅनमध्ये १ मोठा चमचा तेल गरम करून त्यामध्ये १-२ कालवं हातात घेऊन तेलात सोडावीत.

६. कालवं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावीत.

​तुमची गरमागरम कालव्यांची भजी तयार आहेत!


​टीप: भजी अधिक कुरकुरीत हवी असल्यास पिठामध्ये १ चमचा कॉर्नफ्लोअर मिक्स करू शकता.


- शिल्पा रामचंद्र, मांद्रे