अपहरण करून महिलेवर लैंगिक अत्याचार; दागिनेही लुटले : वाळपई पोलिसांनी नोंदवला एकाविरुद्ध गुन्हा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
32 mins ago
अपहरण करून महिलेवर लैंगिक अत्याचार; दागिनेही लुटले : वाळपई पोलिसांनी नोंदवला एकाविरुद्ध गुन्हा

वाळपई : एका महिलेचे (Woman) अपहरण करून लैंगिक अत्याचार (Rape) करून सोन्याचे दागिने लुटल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी (Valpoi Police)  विठ्ठल झोरे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४१ वर्षीय महिलेला जबरदस्तीने कारमध्ये बसवून रेडयेघाट आम्याजवळील खाणीच्या पिटाजवळ नेऊन लैंगिक अत्याचार केले व सोन्याचे दागिने लुटले. पीडित महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून वाळपई पोलिसांनी विठ्ठल झोरे याच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे. त्याचा शोध घेण्यात येत असून, अधिक तपास वाळपई पोलीस करीत आहेत. 


हेही वाचा