केपेतील एकता युवा संघाचा ३ व ४ जानेवारीला ‘एकता उत्सव’

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
केपेतील एकता युवा संघाचा ३ व ४ जानेवारीला ‘एकता उत्सव’

पणजी :  गोव्यातील (Goa) केपे (Quepem) येथील एकता युवा संघाचा ‘एकता उत्सव’ 3 व 4 जानेवारी, 2026 रोजी होणार आहे. या  उत्सवाच्या आयोजन समितीच्या अध्यक्षपदी सुर्यकांत उर्फ श्रीकांत वेळीप यांची एकमताने निवड करण्यात आली. 

गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत एकता उत्सव पाडी - बार्से येथील भगवान महावीर सरकारी हायस्कुलाच्या पटांगणावर होणार आहे. या उत्सवात फुगडी, वेशभूषा, नृत्य, मॅराथोन, चित्रकला, मेहंदी, रांगोळी, टाकाऊतून टिकाऊ, पारंपारिक कला, प्रश्न मंजुषा, लोककला अशा विविध स्पर्धा आयोजीत केल्या आहेत. 

या उत्सवा निमित्त गोवा सरकाराच्या आदिवासी कल्याण खात्याच्या सहकार्याने उद्योग आधार हे पारंपारीक खाद्य व फळ विक्री प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी  फुगडी - प्रमोद  - 9049934224, रूपेश - 8007711628, राजू - 9325299486, एकेरी नृत्य व सांघीक नृत्य - सर्वेश – 8408093062  व प्रकाश - 7888217889, चित्रकला - तुळशीदास -8329494804, रांगोळी व मेहंदी-  संतोष - 99210598194, टाकाऊतून टिकाऊ - प्रदेश - 9673374731, पारंपारीक कला - सुशांत - 9923421516 व सुधाकर - 9405922030, प्रश्न मंजूषा - प्रशांत - 9850458529 व राजेंद्र - 9637577313, लोककला - शैलेश - 9765453453 व महेश - 9764599669 या प्रमुखांशी संपर्क करावा, असे आयोजकांतर्फे कळवण्यात आले आहे.


हेही वाचा