कॉलेज प्रवेश रॅकेट: वास्को येथील महिलेची १२.८६ लाखांची फसवणूक

मुलाला महाराष्ट्रातील महाविद्यालयात प्रवेश देण्याचा केला बहाणा

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
3 hours ago
कॉलेज प्रवेश रॅकेट: वास्को येथील महिलेची १२.८६ लाखांची फसवणूक

 पणजी :  महाराष्ट्रातील (Maharashtra) एका पशुवैद्यकीय महाविद्यालयात मुलाला प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची १२.८६ लाख रुपयांची फसवणूक (Cheating) करण्यात आली. अशा पद्धतीने फसवणूक करणारे रॅकेट (Racket) असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चार जणांनी मिळून ही फसवणूक केली. 

दीपमाला कांबळे यांनी यासंदर्भात वास्को पोलीस स्थानकात (Vasco Police) दाखल केलेल्या तक्रारीनुसार, महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या नेहा कांबळे, उत्तम कांबळे, सुहासिनी कांबळे व आकाश डांगे यांनी ऑगस्ट, २०२३ मध्ये वास्को येथे तिच्याकडून १२ लाख, ८६ हजार रुपये घेतले. ही रक्कम घेऊन तिच्या मुलाला महाराष्ट्रातील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय विज्ञान महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. पूर्ण रक्कम देऊनही मुलाला प्रवेश मिळवून दिला नाही व पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे कळून चुकल्यावर महिलेने तक्रार केली. 

वास्को पोलिसांनी यासंदर्भात भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० यासह ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक वैभव नाईक व उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. कार्व्हालो अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा