'आप'सोबत चर्चा झाली, पण अंतिम निर्णय अद्याप नाही : चर्चिल आलेमाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
'आप'सोबत चर्चा झाली, पण अंतिम निर्णय अद्याप नाही : चर्चिल आलेमाव

मडगाव: आम आदमी पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आतिशी यांनी आपली भेट घेतली असून त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे; मात्र या चर्चेअंती अद्याप कोणताही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही, अशी माहिती माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, 'आप'च्या वरिष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी यांनी काही दिवसांपूर्वी चर्चिल आलेमाव यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत अधिक माहिती देताना चर्चिल म्हणाले की, आतिशी यांच्या व्यतिरिक्त इतरही काही जणांनी माझी भेट घेतली आहे. मात्र, राजकीयदृष्ट्या मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. राज्याच्या सर्व मतदारसंघांत मला मानणारा मोठा वर्ग असून, प्रत्येक मतदारसंघात किमान चार हजार मतदार आजही माझ्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत.

स्वतः चर्चिल किंवा त्यांची कन्या वालंका आलेमाव 'आप'च्या ऑफरचा स्वीकार करणार का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, ही बाब सध्या विचाराधीन आहे. या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून, योग्य वेळी त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


हेही वाचा