६५ टक्के ग्राहकांचे मीटर अडगळीच्या ठिकाणी

उद्यापासून वीज खंडित करण्याची कारवाई : मयूर हेदे, वीज विभागाचे अधीक्षक अभियंता.

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
६५ टक्के ग्राहकांचे मीटर अडगळीच्या ठिकाणी

पणजी : अडगळीच्या ठिकाणांहून वीज मीटर (Electricity Meter)  काढून सोयीस्कर ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचनेला केवळ ३५ टक्के वीज ग्राहकांनी (Electricity Consumer) प्रतिसाद दिला आहे. परिणामी, ६५ टक्के ग्राहकांचे मीटर घराच्या आत किंवा अडगळ्याच्या ठिकाणी आहेत. 

अडगळीच्या ठिकाणी असलेले १२ हजार वीज मीटर स्थलांरीत करण्यात आले आहेत.  सूचनेनुसार स्थलांतर करण्याची अंतिम मुदत शुक्रवारी संपली. आता शनिवारपासून कारवाई सुरू होईल, असे वीज विभागाचे अधीक्षक अभियंता (Goa Electricity Superitendent Engineer) मयूर हेदे यांनी सांगितले.

अडगळीच्या ठिकाणी ३८ हजार वीज मीटर असल्याची माहिती विभागाकडे आहे.  त्यापैकी १२ हजार मीटर स्थलांरीत करण्यात आले आहेत. ज्यांनी आपले मीटर अडगळीच्या ठिकाणी कायम ठेवले आहेत; त्यांची वीज खंडित करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी दिली. 

काही वीज ग्राहकांचे मीटर घरात आत आहेत.  मीटर रीडर बिलाचे रीडिंग घेण्यासाठी येतात तेव्हा घरे बंद असतात. त्यामुळे रिडिंग घेण्यासाठी परत परत जावे लागते. मीटर खूपच उंच असतात तेव्हा रिडिंग घेण्यासाठी कठीण होते. 

कधीकधी मीटर खूपच जास्त असतो. त्यामुळे रीडिंग योग्यरित्या घेता येत नव्हते.  त्यासाठी वीज विभागाने मे महिन्यात ग्राहकांना मीटर स्थलांतरित करण्यासाठी नोटीस बजावली होती.  मीटर स्थलांतरासाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला होता.

आज २८ नोव्हेंबर रोजी मुदत संपत आहे. त्यानंतर आता विभागाचे संबंधित अभियंते सूचनेनुसार कारवाई करणार असल्याचे  अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी सांगितले. विभागाने यापूर्वी अनेक वेळा नोटीस बजावल्या आहेत.  आता कारवाई करण्याशिवाय पर्याय नसल्याचे अधीक्षक अभियंता मयूर हेदे यांनी सांगितले. 

हेही वाचा