कंटेनरची २० ते २५ वाहनांना धडक

पुणे : महाराष्ट्रातील (Maharshtra) पुणे (Pune) येथील नवले पुलाजवळ (Navale Bridge) झालेल्या भीषण अपघातात (Accident) ८ जण ठार झाले आहेत तर २० जण जखमी झाले आहेत. कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्यानंतर रस्त्यावरील वाहनांना धडक देत सुटला. २० ते २५ वाहनांना धडक दिली.
यावेळी दोन कंटेनरमध्ये कार अडकली व चक्काचूर झाला. त्यानंतर सीएनजीवर (CNG) चालत असलेल्या कारला आग लागली. या अपघातात ८ जण ठार झाले तर २० जण जखमी झाले आहेत. कित्येकजण होरपळले. काहीजण गंभीर जखमी झाल्याने; मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील नवले पूल परिसरात भीषण अपघात घडला. सातारा (Satara) येथून मुंबईच्या (Mumbai) दिशेला जात असलेल्या कंटेनरची धडक ब्रेक निकामी झाल्याने २० ते २५ वाहनांना धडक बसली.
त्याच वेळी कंटेनरची धडक एका कारला बसली. धडक बसल्यावर कार दोन कंटेनरमध्ये अडकून चक्काचूर झाला व कारच्या सीएनजी सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली.
कंटेनरमध्ये अडकलेला एक मृतदेह, कारमधून दोन महिला व एका मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातात जखमी झालेल्यांवर नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
डीसीपी संभाजी कदम यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, राजस्थान पासिंग असलेला एक कंटेनर सातारा येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता.
नवले पूल परिसरात त्याचा ब्रेक निकामी झाला व कंटेनर अनेक वाहनांना धडक देत सुटला. या अपघातात घातपाताची शक्यता सध्या तरी दिसत नसल्याचे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.
जखमींना बाहेर काढण्यात आले आहे व मृतदेह शवागृहात पाठवण्यात आले आहेत. आग नियंत्रणात आणण्यात आली. क्रेन आणून रस्त्यावरील दोन मोठी वाहने बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आल्याचे डीसीपी संभाजी कदम यांनी सांगितले.