मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडून कौतुक; वाहतूक गैरसोय टाळण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पणजी: गोवा राज्याची जागतिक स्तरावर 'वेलनेस डेस्टिनेशन' म्हणून प्रतिमा उंचावणाऱ्या 'आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२५' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धेच्या पाचव्या पर्वाला आज रविवार, ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये तब्बल ३१ देशांतील १,३०० हून अधिक ॲथलीट्स सहभागी झाले आहेत.

आयर्नमॅन ७०.३ ही एक अत्यंत आव्हानात्मक स्पर्धा आहे. यामध्ये ॲथलीट्सना सर्वप्रथम अरबी समुद्रात १.९ किलोमीटर पोहणे, त्यानंतर समुद्र किनारी व अंतर्गत रस्त्यांवरून ९० किलोमीटर सायकल चालवणे आणि शेवटच्या टप्प्यात पणजीच्या रस्त्यांवरून २१.१ किलोमीटर धावणे (हाफ मॅरेथॉन) असे तीन टप्पे पूर्ण करावे लागतात. स्पर्धा अत्यंत आव्हानात्मक असली तरी गोव्याच्या निसर्गरम्य भूभागामुळे हा इवेंट आयर्नमॅन कॅलेंडरवरील सर्वाधिक पसंतीच्या शर्यतींपैकी एक मानला जातो.
मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विशेष उपस्थिती होती. त्यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे गोवा हे कसे एक मोठे 'स्पोर्टिंग हब' बनत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा पर्यटनाला कशी चालना मिळत आहे, याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी नागरिकांना आवाहन केले की आयर्नमॅन ७०.३ सारख्या आंतरराष्ट्रीय इव्हेंट्समुळे काही प्रमाणात गैरसोय होत असली, तरी राज्याच्या पर्यटनाच्या वाढीसाठी अशा इव्हेंट्सची मोठी मदत होते. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारच्या इव्हेंट्सना विरोध न करता सहकार्य करावे.
यंदाच्या स्पर्धेत वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्र होण्यासाठी स्पर्धा करणारे एलिट ॲथलीट्स तसेच पहिल्यांदाच सहभागी होणारे हौशी ॲमेच्युअर ॲथलीट्स यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे.
वाहतूक नियमांमध्ये मोठे बदल; प्रवासाचे नियोजन आवश्यक
स्पर्धेदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी गोवा वाहतूक पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी पहाटे ३:०० वाजेपासून स्पर्धा संपेपर्यंत अनेक रस्त्यांवर बदल आणि निर्बंध जाहीर केले आहेत. वाहनचालकांना प्रवासाचे नियोजन अगोदरच करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मार्गांवर वाहतूक बंद:
झुआरी पूल आणि कुठ्ठाळी येथील बदल:
नागरिकांसाठी पर्यायी मार्ग:
डी.बी. मार्गावरील रहिवाशांसाठी 'मिरामार रेसिडेन्सी गेट ते हॉटेल मॅरियट लेन' पर्यंत समर्पित कार लेन उपलब्ध असेल. तसेच, अनेक रस्त्यांवर दुहेरी वाहतुकीची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे आणि मार्गदर्शनाचे काटेकोर पालन करावे आणि दुपारी ३:०० वाजेपर्यंत या बाधित भागातून अनावश्यक प्रवास टाळावा.