पेडणेतील प्रगतीशील शेतकरी प्रभुदेसाई यांचे उपोषण

करंजाळेतील कृषी कार्यालयाजवळ बसले उपोषणाला

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पेडणेतील प्रगतीशील शेतकरी प्रभुदेसाई यांचे उपोषण

पणजी : पेडणे (Pernem, Goa) येथील प्रगतीशील शेतकरी (Farmer) उदय प्रभुदेसाई टोंक, करंजाळे येथील कृषी खात्याच्या मुख्यालयातील व्हरांड्यात उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत. पेडणे तालुक्यातील कापणी प्रक्रियेत गोंधळ व गैरव्यवस्थापन (Mismanagement) असल्याचा दावा त्यांनी केला.

त्याचा निषेध करण्यासाठी आपण उपोषणाला बसलो असल्याचे सांगितले.  

शांतपणे उपोषण करून संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष शेतकऱ्यांच्या समस्या, आव्हानांकडे  वळवावे हा त्यामागे हेतू आहे.  कृषी क्षेत्र व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून त्यांना चालना द्यावी. त्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात अशी मागणी शेतकरी उदय प्रभुदेसाई यांनी केली आहे. 

हेही वाचा