मत्स्योद्योग मंत्र्यांना ही पाठवले पत्र

पणजी : दक्षिणगोव्यातील (South Goa) सासष्टीतालुक्यातील कुटबण येथे (South Goa) दोन दिवसांमागे साळ नदीच्या (Sal River) वाळूच्या पट्टयात (Sand Bar) मच्छीमारी बोट अडकल्यानंतर वाळूच्या पट्ट्यांची समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
यासंदर्भात वेळ्ळीचे आमदार (Mla) क्रुझ सिल्वा यांनी मुख्यमंत्री (Chief Minister Goa) डॉ. प्रमोद सावंत (Dr.Pramod Sawant) व मत्स्योद्योगमंत्री (Fisheries Minister, Goa) निळकंठ हळर्णकर यांच्याशी पत्रव्यवहार करून समस्येवर चर्चा करण्यासाठी लवकर बैठक घेण्याची मागणी केली आहे.
गुरुवारी समुद्रात मासेमारी करून एक बोट परत येत असताना साळ नदीच्या तोंडावर असलेल्या वाळूच्या पट्टयात अडकली होती. यापूर्वीही अनेक वेळा असे प्रकार घडले आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्याची मागणी मच्छीमार संघटना, बोटमालकांककडून होत होती.
आमदार क्रुझ सिल्वा यांनीही या समस्येवर चिंता व्यक्त करताना सांगितले की, याच आठवड्यात असे दोन प्रकार घडले आहेत. या अशा घटना वारंवार घडल्यास मच्छीमारांच्या जीवाला व व्यवसायाला ही धोका आहे.
साळ नदीच्या वाळूच्या पट्ट्यांच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारण्याचे काम पुढे सरकलेले नाही. मत्स्य खाते भिंत उभारण्यासाठी पर्यावरण दाखला घेण्यास वेळकाढू धोरण अवलंबत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने अटींवर भिंत उभारण्याच्या प्रकाराला मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व मत्स्योद्योगमंत्री निळकंठ हळर्णकर यांच्याशी पत्रव्यवहार करून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. चर्चेसाठी बैठक घेण्याची मागणी केली असल्याचे आमदार सिल्वा यांनी सांगितले.