वंदे मातरम् गीताची १५० वर्षे; जीएचआरडीसीने बनवली मानवी साखळी

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
वंदे मातरम् गीताची १५० वर्षे; जीएचआरडीसीने बनवली मानवी साखळी

 पणजी : गोवा (Goa) मानव संसाधन विकास महामंडळाने (GHRDC) वंदे मातरम् च्या १५० व्या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मानवी साखळी (Human Chain) करून या गीताला मानवंदना दिली. केपे येथील सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालात (Quepem Government Art,Science and Commerce college) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचा एक भाग होता.

कुडचडेचे आमदार निलेश काब्राल या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. केपेचे उपजिल्हाधिकारी मनोहर कारेकर, उपप्राचार्य डॉ. मेहताब बुखारी, पोलीस व वनकर्मचारी उपस्थित होते.  जीएचआरडीसीचे ज्येष्ठ सुरक्षा अधिकारी इच्छीत फळदेसाई आपल्या १५० कर्मचाऱ्यांसह सहभागी झाले होते. त्यांनी मानवी साखळी करीत अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली.