९ नोव्हेंबरला झुवारी पुलावरील वाहतुकीत बदल

‘आयर्नमॅन ७०.३ गोवा सायकलींग’साठी बदल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
९ नोव्हेंबरला झुवारी पुलावरील वाहतुकीत बदल

पणजी : ‘आयर्नमॅन ७०.३ गोवा सायकलींग लेग’साठी ९ नोव्हेंबरला एनएच ६६ महामार्गावरील केटीसी सर्कल ते नव्या झुवारी पुलावरील वाहतुकीत सार्वजनिक बांधकाम खात्याने पहाटे ५ ते दुपारीपर्यंत ३ पर्यंत तात्पुरते बदल केले आहेत. दुचाकी वाहने फोंडा ते पणजी मार्गाने जाऊ शकतात. 

दरम्यान, वाहतुकीत करण्यात आलेले हे बदल लक्षात घेऊन वाहनचालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.