मालकांमध्ये चिंता

मडगाव : गोव्यातील (Goa) माजोर्डा (Majorda beach) येथील समुद्रकिनाऱ्यावरील शॅकमध्ये (Beach Shack) समुद्राचे पाणी शिरले. अगदी स्वयंपाकगृहापर्यंत पाणी पोचले. त्यामुळे शॅक मालक चिंतेत पडले आहेत. पाणी शिरलेल्या ठिकाणी शॅक ठेवावे की, अन्यत्र हलवावे हा प्रश्न शॅक मालकांना पडला आहे.
काही शॅक मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. आणि शॅकमध्ये पाणी शिरले. समुद्राचे पाणी शॅकच्या स्वयंपाकघरापर्यंत पोचल्याने, फटका बसला.
माजोर्डातील काही शॅकमध्ये यापूर्वीही पाणी शिरल्याने शॅक मालकांना फटका बसला आहे. गेल्या वर्षी पाणी शिरल्यानंतर मालकांनी पर्यटन खात्याकडे (Goa Tourism Department) तक्रार केल्याची व पर्यायी जागा देण्याचे सूचित केले होते, अशी माहिती काही शॅक मालकांनी दिली.
याठिकाणी पूर व भरतीचे पाणी शिरण्याची भीती त्यांना सतावत आहे. पर्यटन खाते यावर काहीतरी तोडगा काढणार अशी अपेक्षा असल्याचे मालकांनी सांगितले.