
नवी दिल्ली : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे. केंद्र सरकारने (Central Governmen) त्यांच्यासाठी स्वेच्छानिवृत्ती विषयी महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ‘पेन्शन व पेन्शनर’ (Pension and Pensioner) कल्याण’ विभागाने ‘नेशनल पेन्शन सिस्टम’ (National Pension System) खाली युनिफाइड पेन्शन स्कीमची निवड केली आहे, अशा कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
डीवोपीपीडब्ल्यू च्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, युपीएस निवडलेले केंद्रीय कर्मचारी नियम १३ अंतर्गत स्वेच्छानिवृत्तीचा लाभ उठवू शकतात. या नियमानुसार, कोणत्याही कर्मचाऱ्यांना २० वर्षे सेवा बजावलेली असेल, तर ते स्वत:हून सेवामुक्त होऊ शकतात.
तसा अधिकार त्यांना आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्ती प्राधिकरणाला किमान तीन महिन्यांपूर्वी लेखी स्वरूपात याविषयी सूचना देणे अनिवार्य आहे. २० वर्षांची सेवा झाली की, स्वेच्छानिवृत्ती घेऊ इच्छिणारे पूर्वसूचना देऊ शकतील. पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.