केंद्रात सत्ता असते त्यांचीच सत्ता गोव्यात असते : मंत्री विश्वजीत राणे

मालभाट येथे अर्बन आयुषमान आरोग्य मंदिराचे उद्घाटन

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
2 hours ago
केंद्रात सत्ता असते त्यांचीच सत्ता गोव्यात असते : मंत्री विश्वजीत राणे

मडगाव : केंद्रात सत्ता असते त्यांचीच सत्ता गोव्यात (Goa) असते. यापुढेही आमचेच सरकार येईल. विरोधकांनी कितीही हातात हात घेतले तरी त्याचा उपयोग होणार नाही.

हेच विरोधक मंत्रीपद देतो म्हटले तर धावत आमच्याकडे येतील, असे आरोग्य मंत्री (Health Minister, Goa) विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी सांगितले.

 मालभाट, मडगाव (Margao) येथील अर्बन आयुषमान आरोग्य मंदिराचे मंत्री विश्वजित राणे यांचे हस्ते उद्घाटन झाले. मंत्री दिगंबर कामत यांच्यासह संचालक रूपा नाईक, आरोग्य अधिकारी बाप्तिस्ता मास्कारेन्हस, मुख्याधिकारी मधु नार्वेकर आदी उपस्थित होते.

 मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले की, सांगे, तुये, सावर्डेतील इस्पितळात आवश्यक त्या सुविधा देण्यात येत आहेत. आरोग्य मंदिरात आयस्टड मशीन उपलब्ध केले जातील.

सामान्य जनतेला काय पाहिजे हे समजून घेण्याची गरज आहे. भाजप सरकार राज्यात व देशात असून अनुभवी नेतृत्व आहे. सर्वसामान्य लोकांची बांधकाम नियमित केली जात आहेत. आरोग्य सेवा ही लोकांच्या घरापर्यंत पोहोचवली जात आहे.

सामाजिक न्याय हा शब्द वापरून होत नाही तर त्यासाठी प्रयत्नही करावे लागतात. राज्यात ४५० कोटींची औषधे मोफत दिली जातात. एआयचा वापर करून मेडिकल रिपोर्ट तयार केले जातील.

यापुढील सरकार हे आमचेच येईल. कुणी कितीही तयारी केली तरी त्यांचे काहीही होणार नाही. मतदारसंघावर प्रभाव असलेले नेते असून लोकांसाठी काम करत आहेत.

हातात हात घेतले म्हणून सत्ता मिळत नाही. मंत्रीपद देतो म्हणून सांगितले तर लगेच धावत येतील. विरोधक काय करतात कुणाला भेटतात तेही लोकांनी पाहावे, अशी टीकाही मंत्री राणे यांनी केली.

मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले की, आरोग्य चांगले असल्यास सर्व चांगले असते. अर्बन आरोग्य मंदिर या योजनेतर्गंत वैद्यकीय सेवा पुरवठा केंद्र उभारण्यात आले आहे. प्रधानमंत्री विकसित भारताचे स्वप्न पाहत असून, त्यासाठी समाजाचा विकास होण्याची गरज आहे.

यासाठी शिक्षण व आरोग्य या घटकांकडे लक्ष देण्याची गरज आहे. पहिले आरोग्य मंदिर मोतीडोंगर येथे सुरू झाले व त्याठिकाणी रक्त तपासणी केली जाते. १०८ रुग्णवाहिका, जन्मलेल्या मुलाची स्क्रिनिंग अशा योजना राणे यांनी आणलेल्या आहेत.  

या भागात होणारी अस्वच्छता दूर होणार याची काळजी घेण्याच्या सूचना पोलिस व पालिकेला केलेल्या आहेत. याठिकाणी औषधे मोफत देण्यात येतील. गोमेकोत कार्डिओलॉजी विभाग चांगला सुरू आहे.

रस्त्यावरील गाडेकरांसाठी योजना सुरू केली असून त्यासाठी पालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यानंतर त्यांचा मेळावा घेत योजनेची माहिती देण्यात येईल. त्यांना व्यवसायासाठी अर्थ साहाय्य केले जाणार आहे.

माझे घर ही योजना सामान्य लोकांसाठी आहे. मडगावात प्रभागनिहाय बैठक घेत फॉर्म भरून घेतले जातील. मडगावात नवे प्रकल्प हाती घेतलेले आहेत. पण काहींना हा विकास दिसत नाही अशा शब्दात विरोधकांवर कामत यांनी टीका केली.

 लवकरच जिल्हा इस्पितळात अत्यावश्यक सेवा

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ यांच्यात आवश्यक ते सर्व सुविधा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री सावंत यांच्याशी कॅबिनेट बैठकीत चर्चा केलेली आहे. गोमेकोत ज्याप्रमाणे अपघात झाल्यास मिळणाऱ्या सुविधा मिळतात त्याप्रमाणे जिल्हा इस्पितळात मिळतील. पाच ते सहा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवलेले आहेत. ४ महिन्यात ते मार्गी लागतील.

विरोधकांना निवडणुकीत हा प्रश्न घेता येणार नाही त्याआधीच समस्या सुटतील, असे मंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले.  तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात न्यूरोलॉजी विभाग, ऑर्थोलॉजी विभाग सुरू व्हावे अशी मागणी केलेली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून महिनाभरात हा प्रश्न सोडवण्यात येईल, असे मंत्री कामत म्हणाले.


हेही वाचा