ओझरी, पेडणेत बिबट्याच्या हल्ल्यात ३ महिन्यांत ११ वासरांचा मृत्यू : राजाराम नाईक

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
39 mins ago
ओझरी, पेडणेत बिबट्याच्या हल्ल्यात ३ महिन्यांत ११ वासरांचा मृत्यू : राजाराम नाईक

पेडणे :  ओझरी, पेडणे (Pernem, Goa) येथे राजाराम नाईक यांच्या गोठ्यात बांधलेल्या गुरे, वासरांवर (Cattles) हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बिबटे (Leopard) वारंवार हल्ले करीत आहेत.

अशाप्रकारे गेल्या तीन महिन्यांत ११ वासरांचा मृत्यू झाला असल्याचे राजाराम नाईक यांनी सांगितले. अनेक वेळा अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला.  मात्र, वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी अजून पिंजरा लावलेला नाही.

वझरी परिसर घनदाट जंगल परिसरू असून, याठिकाणी ग्रामस्थांना ही धोका होऊ शकतो.  शाळेत जाणाऱ्या मुलांना ही धोका असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 


हेही वाचा