
बिहार : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Election 2025) मतदान (Voting) सुरू झाले आहे. या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी गोवा सशस्त्र पोलिसांचे पथक (Goa Armed Police) रवाना झाला आहे. त्यात एकूण ६०० पोलिसांचा समावेश आहे. छापरा जिल्ह्यात या पोलिसांना तैनात करण्यात आले आहे.
पूर्व बिहार, कोसी येथील मुंगेर, लखीसराय, खगडिया, मधेपुरा व सहरसा पाच जिल्ह्यांत मतदान सुरू होते. सकाळी ११ पर्यंत ३० टक्के मतदान झाले होते. राज्य निर्वाचन आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, येथील १७ विधानसभा जाग्यांवर सकाळी ९ वाजेपर्यंत १४.४ टक्के मतदान झाले होते.
पहिल्या दोन घंट्यांनंतर मतदारांची संख्या हळू हळू वाढत होती. जास्त उत्साह सहरसा जिल्ह्यात दिसून येत होता. मतदानात सिमरी बख्तियारपुर सीट मतदानात पुढे होते.
कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. त्यात गोवा पोलिसांचा ही समावेश आहे. गोव्यातून गेलेल्या ६०० पोलिसांना छापरा जिल्ह्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.