मडगाव : दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या १० जणांना प्रतिबंधात्मक अटक

कोलवा पोलिसांची नाकाबंदी; विना लायसन्स वाहन चालवणे भोवले; ५ वाहने जप्त

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th October, 02:13 pm
मडगाव : दारू पिऊन सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या १० जणांना प्रतिबंधात्मक अटक

मडगाव: कोलवा पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अचानक नाकाबंदी करत दहा संशयितांवर प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईत विना वाहन परवाना गाड्या चालवल्याप्रकरणी पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या, तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या एका चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 राज्यातील वाढत्या गुन्ह्यांवर आळा आणण्यासाठी दक्षिण गोव्यातही पोलिस बंदोबस्त व गस्त वाढवण्यात आलेली आहे. कोलवा पोलिसांनी पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी रात्री अचानक नाकाबंदी करत गाड्यांची तपासणी मोहीम राबवली. या नाकाबंदीवेळी कोलवा पोलिसांनी मद्यपान करुन गाडी चालवणार्‍या संशयितावर गुन्हा नोंद केलेला आहे. वाहन परवाना नसतानाही दुचाकी घेऊन फिरणार्‍या पाचजणांवर कारवाई करत गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व इतर गोष्टी करत शांतता भंग करणार्‍या दहा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंद करत प्रतिबंधात्मक अटकेची कारवाई करण्यात आली.

हेही वाचा