त्सुनामीचा इशारा मागे : दहा दिवसांत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के
मिंडानाओ : फिलीपाईन्स येथील मिंडानाओ येथे ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. जीवघेण्या लाटांसह त्सुनामी येणार असा इशारा देण्यात आला होता. लोकांनी सुरक्षित स्थळी जावे अशी सूचना जारी करण्यात आली होती. मात्र, नंतर त्सुनामीचा धोका टळला असल्याचे सांगण्यात आले. दहा दिवसांपूर्वी फिलीपाईन्स मध्ये भूकंप झाला होता. त्याची ६.९ रिश्टर स्केल एवढी तीव्रता होती. त्यात ६० जण ठारे झाले होते. इमारती, घरे कोसळून मोठी हानी झाली होती.
शाळांमधून मुलांना काढले बाहेर
युरोपियन भूमध्य भूकंप केंद्राने माहिती जारी केली की, भूकंपाचा धक्का ६२ किमी खोलीवर होता. दावाओ शहरातील शाळांमध्ये मुलांना बाहेर काढण्यात आले. याठिकाणी सुमारे ५४ लाख लोक राहतात. भूकंपाच्या केंद्राजवळील मोठे शहर आहे. दावाओ ओरिएंटल प्रांतापासून सुमारे २५० किलोमीटर पश्र्चिमेला शहर आहे. मिंडानाओ, दावाओ, ओरिएंटलमधील माने शहराजवळ पाण्यात झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर स्थानिक एजन्सीने नुकसानीचा व आणखी धक्के बसण्याचा इशारा दिला. सुरवातील ७.६ तीव्रता असल्याचे म्हटले होते. मात्र, नंतर ७.५ रिश्टर स्केल तीव्रता व भूकंपाची खोली २० किमी ठेवली.
दहा दिवसांपूर्वी फिलीपाईन्स मध्ये भूकंप झाला होता. त्याची ६.९ रिश्टर स्केल एवढी तीव्रता होती. त्यात ६० जण ठारे झाले होते. इमारती, घरे कोसळून मोठी हानी झाली होती.