रामा हल्ला प्रकरण: सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोजोच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबर रोजी सुनावणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
08th October, 04:23 pm
रामा हल्ला प्रकरण: सराईत गुन्हेगार जेनिटो कार्दोजोच्या जामीन अर्जावर १० ऑक्टोबर रोजी सुनावणी

पणजी : सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ला प्रकरणी अटकेत असलेल्या जेनिटो कार्दोजो या सराईत गुन्हेगाराच्या जामीन अर्जावर पणजी सत्र न्यायालयात १० ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने या संदर्भात पोलिसांना त्यांचे सविस्तर म्हणणे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या सुनावणीदरम्यान बचाव पक्ष आणि सरकारी वकील या दोघांचेही युक्तिवाद ऐकले जाणार आहेत.

रामा काणकोणकरांचा जामीनाला विरोध

या गुन्ह्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या जेनिटो कार्दोजो याला जामीन मिळू नये, यासाठी खुद्द जखमी झालेले रामा काणकोणकर यांनी न्यायालयात विरोध अर्ज दाखल केला आहे. 


हेही वाचा