
पणजी : मेसर्स स्रेसन फार्मास्युटिकल उत्पादित कोल्ड्रिफ सिरप (बॅच क्रमांक एसआर - १३) वापर व विक्री त्वरित थांबविण्याची सूचना अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जारी केली आहे. हे औषध कोणाजवळ असले तर त्यांनी [email protected] वर कळवावे, असेही एफडीएन सूचित केले आहे.
या सिरपच्या सेवनामुळे मध्य प्रदेशमध्ये मुलांना मरण आले होते. या घटनेनंतर मध्य प्रदेश एफडीए कार्यालयाने कोल्ड्रीफ सिरपच्या नमुन्यांची तपासणी केली होती. या सिरपमध्ये डायईथीलीन ग्लायकॉलचा अंश सापडला होता. डायईथीलीन ग्लायकॉल हा घातक (टॉक्सीक) पदार्थ आहे. यामुळे राज्यातील सर्व केमीस्ट, ड्रगिस्ट व वितरकानी कोल्ड्रीफ सिरप (बॅच क्रमांक एसआर - १३) ची विक्री वा पुरवठा बंद करावा असे एफडीएने कळविले आहे. जनतेनेही या सिरपबाबत सावधानता बाळगावी असे एफडीएने सूचना दिलेल्या नोटिशीत म्हटले आहे.