पाकिस्तानवर ५ गडी राखून मात : नवव्यांदा आशिया चषकावर कब्जा
दुबई : भारताने पुन्हा एकदा आशिया कपवर आपले वर्चस्व प्रस्थापित करत २०२५ टी-२० आशिया कपचे विजेतेपद पटकावले. २०२३ मध्ये एकदिवसीय आशिया कप जिंकल्यानंतर आता भारतीय संघाने टी-२० फॉर्मेटमध्येही यश मिळवत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा ५ गडी राखून पराभव करत रोमांचक विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला १९.१ षटकांत केवळ १४६ धावांत गुंडाळले.
पाकिस्तानकडून साहिबजादा फरहान (५७) आणि फखर जमान (४६) यांनी सुरुवातीला धडाकेबाज खेळी केली होती. १० व्या षटकात त्यांचा स्कोअर ८४/१ असा होता. मात्र त्यानंतर भारतीय फिरकीपटूंनी सामन्याची दिशा बदलली. कुलदीप यादवने केवळ ६.२७ च्या इकॉनॉमीने ४ बळी घेतले, तर अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २ बळी मिळवत पाकिस्तानचा डाव १४६ वर थांबवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा (५), शुभमन गिल (१२) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१) अपयशी ठरले. पण मधल्या फळीत तिलक वर्माने डाव सावरला. त्याने ५३ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६९ धावा ठोकल्या. त्याला शिवम दुबेने २२ चेंडूत ३३ धावांची झळाळती साथ दिली. संजू सॅमसननेही २४ धावा करत योगदान दिले. शेवटी भारताने १९.४ षटकांत ५ गडी गमावून १५० धावा करत सामना आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.
दुबईतील भव्य स्टेडियममध्ये भरलेल्या चाहत्यांसमोर पाकिस्तानने फक्त चुरशीवर सुरूवात करूनही शेवटी सर्वबाद १४६ धावा केल्या. एकेकाळी बिनबाद ८४ धावा असताना पहिला गडी बाद होताच पाकिस्तानच्या मध्यक्रमाची कमकुवत बाजू उघडकीस आली पुढील ६२ धावांत सर्व गडी तंबूत परतले. आणि त्यांचा डाव १९.१ षटकांममध्ये संपुष्टात आला. सुरुवातीला पाकिस्तानने चांगली सुरुवात केली. संघाने ९.३ षटकांत बिनबाद ८४ धावा केल्या. परंतु १० व्या षटकात पहिला गडी बाद होताच पडताच परिस्थिती बदलली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दबाव वाढविला आणि पाकिस्तानचे झटपट गडी बाद केले. पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ३८ चेंडूत ५७ धावा केल्या आणि फखर जमाने ३५ चेंडूत ४६ अशी उपयोगी पारी खेळली. सईम अयूबने ११ चेंडूत १४ धावा केल्या. पण त्यांच्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याच फलंदाजाने दहापर्यंतही धावा जमवता आल्या नाहीत.
भारताकडून कुलदीप यादवने ४ बळी, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी २ गडी बाद कले. भारतीय क्षेत्ररक्षण या सामन्यात चांगले झाले. संजू सॅमसनने दोन अप्रतिम कॅच पकडून सामन्याला कलाटणी दिली.
साहिबझादा फरहाने केला खास विक्रम
दहाव्या षटकात वरुण चक्रवर्तीने साहिबझादा फरहानला बाद करत भारताला पहिली विकेट्स मिळवून दिली. त्याचबरोबर एक घातक भागीदारी संपुष्टात आणली. तत्पूर्वी साहिबझादाने बुमराहविरुद्ध एक खास पराक्रम नोंदवला. साहिबजादाने याच आशिया कपमध्ये बुमराहविरुद्ध दोन षटकार ठोकले होते, आणि फायनलमध्ये आणखी एक षटकार ठोकत त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक ३ षटकार ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.
टी-२० मध्ये बुमराहविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
३ साहिबझादा फरहान
२ एल्टन चिगुंबुरा
२ लेंडल सिमन्स
२ किरॉन पोलार्ड
२ मार्टिन गुप्टिल
२ कॅमरुन ग्रीन
टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक बळी
१७ बळी : कुलदीप यादव, आशिया कप २०२५
१७ बळी : फजलहक फारूकी, टी२० विश्वचषक २०२४
१७ बळी : अर्शदीप सिंग, टी२० विश्वचषक २०२४
१६ बळी : वानिंदू हसरंगा, टी२० विश्वचषक २०२१
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये (१ ते ६ षटकांत) सर्वाधिक बळी
६५ बळी : टिम साऊदी
५२ बळी : शाहीन शाह आफ्रिदी
५१ बळी : मार्क अडेर
५१ बळी : रिचर्ड नगारावा
४७ बळी : भुवनेश्वर कुमार
४७ बळी : ब्लेसिंग मुजाराबानी