आ​शिया कपमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th September, 12:19 am
आ​शिया कपमध्ये भारत-पाकिस्तान अंतिम सामना

दुबई : दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आशिया कप २०२५ च्या १७ व्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर ११ धावांनी विजय मिळवून आशिया कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानचा सामना भारताशी होणार आहे.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १३५ धावा केल्या. मोहम्मद हारिसने सर्वाधिक ३१ धावा केल्या. नवाजने १५ चेंडूत २५ धावांची खेळी केली. शाहीन अफरीदीने १९, सलमान अलीने १९ आणि फहीमने १४ धावा केल्या. बांगलादेशकडून तस्कीन अहमदने ३ गडी बाद केले. बांगलादेशचा संघ २० षटकांत ९ बाद १२४ धावा करू शकला.
१३६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशची सुरुवात खराब झाली. इमॉन शून्यावर बाद, तौहीदने ५ धावा केल्या. सैफ हसनने १८ धावा, मेहदी हसनने ११, नुरूल हसनने १६ आणि कर्णधार जाकिर अलीने फक्त ५ धावा केल्या. शाहीन अफरीदीने आणि हारिस राैफने प्रत्येक ३, तर सईम अयूब यांनी २ गडी बाद केले.
४१ वर्षांत प्रथमच फायनलमध्ये आमने-सामने
भारतीय संघ आशिया कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सुपर फोर सामन्यात भारताने बांगलादेशचा ४१ धावांनी पराभव केला. पाकिस्तानने बांगलादेशाचा पराभव केल्यामुळे आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासातील हा पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान अंतिम सामना होणार आहे.