वेर्णा येथे अपघातानंतर वाहतूक कोंडी; वाट काढताना वाहन चालकांची उडाली तारांबळ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
29 mins ago
वेर्णा येथे अपघातानंतर वाहतूक कोंडी; वाट काढताना वाहन चालकांची उडाली तारांबळ

पणजी : वेर्णा रस्त्यावर आज सकाळीच रुग्णवाहिका, कार, ट्रक व अन्य एका वाहनाचा अपघात घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली तरी अनेकांना किरकोळ दुखापत झाली. या अपघातामुळे वाहतूक पोलिसांना वेर्णा उतरंडीवर असलेल्या पेट्रोल पंपानजीक असलेल्या वाहतूक बेटाजवळ एका बाजूने रस्ता वाहतूक बॅरीकेड टाकून बंद करावा लागला. त्यात वाहने अडकून पडली व मोठी रांग लागली. त्यामुळे नोकरी, व्यवसाय व अन्य कामांसाठी लवकर पणजी गाठण्याच्या इराद्याने बाहेर पडलेल्या वाहन चालकांची तारांबळ उडाली. वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत करण्यात गुंतले होते. वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात काहीजणांना किरकोळ दुखापत झाली. तरी सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.



या रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय सरकारी पातळीवर झाला आहे. त्यासाठी या परिसराचे सर्वेक्षण ही झाले आहे. मात्र, उड्डाणपूल होई पर्यंत या रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार का? हा प्रश्न नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पडला आहे.


Multi-Vehicle Accident in Verna Leaves Several with Minor Injuries


उड्डाणपूल उभारण्यासाठी सर्व्हेक्षण

वेर्णा येथे होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या रस्त्यावर उड्डाणपूल उभारण्यात येणार असून, त्यासाठी सर्वेक्षण करून प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी फातोर्डा येथे नव्यानेच सुरू केलेल्या वाहतूक विभागाचे उद्घाटन करण्यासाठी आले असताना सांगितले होते. हा उड्डाणपूल लवकर व्हावा वाहतूक कोंडी लवकर सुटावी, अशी मागणी या रस्त्यावरून नियमित प्रवास करणारे वाहनचालक करीत आहेत.