गोवा : जिल्हा पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले

काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
55 mins ago
गोवा : जिल्हा पंचायत निवडणुकीचे पडघम वाजू लागले

पणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी, राजकीय पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. आम आदमी पक्षाने तयारीसाठी तालुकाप्रमुखांची निवड केल्यानंतर काँग्रेसनेही उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे.



विधानसभा निवडणुकीसाठी अद्याप दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यापूर्वी, डिसेंबरच्या सुमारास जिल्हा पंचायत निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांचे निकाल राजकीय पक्षांना जनतेच्या कौलाचा अंदाज घेण्यास मदत करतील आणि त्यानुसार त्यांना आगामी विधानसभेसाठी रणनीती आखणे शक्य होईल. यामुळे, जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने मतदारसंघ फेररचनेचा मसुदा सूचनांसाठी खुला केला आहे. यामुळे, निवडणूक आयोगाकडूनही जिल्हा पंचायत निवडणुकीची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट होते.



काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी जिल्हा समित्यांची बैठक घेतली. दोन्ही बैठकांना प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर उपस्थित होते. यावेळी, तळागाळात काम करणाऱ्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासातल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल, असे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा