लॉरीला आदळून दुचाकी चालकाचा मृत्यू

मित्राचा वाढदिवस साजरा करून परतताना अपघात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th September, 11:12 pm
लॉरीला आदळून दुचाकी चालकाचा मृत्यू

मडगाव : मोबोर-केळशी येथे हॉटेलबाहेरील रस्त्यावर उभ्या केलेल्या लॉरीला दुचाकीची धडक बसली. यात दुचाकीचालक लक्ष वाधवा (२२, मूळ रा. जयपूर) याचा मृत्यू झाला. सोमवारी पहाटे झालेल्या या अपघाताचा पंचनामा करून कोलवा पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानातून जयपूर येथील लक्ष्य वाधवा हा केळशी परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्रंट ऑफिसर म्हणून काम करत होता. रविवारी रात्री त्याच्या मित्राचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने बाणावली येथे पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. मित्राची वाढदिनाची पार्टी ओटोपून परत येताना मोबोर-केळशी येथील एका हॉटेलच्या बाहेर उभ्या करण्यात आलेल्या लॉरीचा त्याला अंदाज आला नाही व दुचाकी लॉरीला जाऊन आदळली. या अपघातात लक्ष्य वाधवाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
हा अपघात सोमवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास घडला. अपघातानंतर जखमी अवस्थेत दुचाकीचालक लक्ष्य याला दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीअंती मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. कोलवा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व अपघातप्रकरण नोंद करून घेतले आहे. याप्रकरणी कोलवा पोलीस निरीक्षक विक्रम नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निखिल खाजणेकर पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा