साहित्य:
पनीर: २०० ग्रॅम (किसलेले)
टॉमेटो: ३ मोठे (बारीक चिरलेले)
भोपळी मिरची (शिमला मिरची):
२ (बारीक चिरलेली)
अमूल चीज क्यूब्स: ३ ते ४ (किसलेले)
पावभाजी मसाला: दीड ते २ चमचे
काश्मिरी लाल तिखट: दीड ते २ चमचे
गरम मसाला: दीड चमचा
कसुरी मेथी: दीड चमचा
टोमॅटो केचप: २ चमचे
धने-जिरे पावडर: दीड चमचा
बटर: दीड चमचा
तेल: फोडणीसाठी
पाणी: दीड वाटी (आमटीच्या वाटीने)
हिंग, हळद आणि मीठ: चवीनुसार
कृती:
एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग आणि हळद घाला.
त्यानंतर त्यात बारीक चिरलेले टॉमेटो आणि भोपळी मिरची टाकून चांगले परतून घ्या.
२ मिनिटांनी सगळे मसाले (पावभाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, टोमॅटो केचप, धने-जिरे पावडर), मीठ आणि बटर टाकून तेल सुटेपर्यंत परता.
आता त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्या.
एक वाफ काढून त्यात किसलेले चीज टाकून २ मिनिटे वाफ काढा.
तुमचा पनीर घोटाळा तयार आहे.
पावासोबत खाण्यासाठी:
हा पनीर घोटाळा पावाबरोबर खाण्यासाठी, लादी पाव घ्या. तव्यावर बटर वितळवा, त्यात थोडे काश्मिरी लाल तिखट आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा. आता पाव मधून कापून घ्या आणि हे मिश्रण पावाच्या दोन्ही बाजूंना लावून शेकून घ्या.
शिल्पा रामचंद्र ,मांद्रे