मोपा पोलिसांकडून तपास सुरू
पेडणे : हळर्ण येथील श्री वेताळ मंदिरात चोरट्याने फंडपेटी फोडून पैसे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. निळ्या रंगाचा रेनकोट घातलेला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आज सकाळी मंदिराचे पुजारी दरवाजा उघडण्यासाठी आले असता, मुख्य दरवाजाचे कुलूप कटरच्या सहाय्याने तोडलेले त्यांनी पाहिले. आत प्रवेश केल्यावर फंडपेटी फोडलेली आणि पैसे गायब असल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती देवस्थान पदाधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर देवस्थान अध्यक्षांनी मोपा पोलीस स्थानकात चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तपास सुरू केला आहे.