सासष्टी : मतचोरी मोठी गोष्ट नाही; खरा धोका तर ईव्हीएमचा आहे : चर्चिल आलेमाव

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th August, 03:38 pm
सासष्टी : मतचोरी मोठी गोष्ट नाही; खरा धोका तर ईव्हीएमचा आहे : चर्चिल आलेमाव

मडगाव : मतचोरी ही मोठी गोष्ट नाही, त्याने निवडणुका जिंकता येत नाहीत. मात्र, ईव्हीएम फेरफारमुळे मोठा फरक पडतो. त्यामुळे सत्तेत असलेला पक्षच कायम राहणार. विकसित देशांप्रमाणे भारतातही मतपत्रिकेद्वारे मतदान व्हावे, असे मत माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी व्यक्त केले.

माजी मुख्यमंत्री चर्चिल यांनी मतचोरी या विषयावर बोलताना राज्याबाहेरून आलेल्या लोकांद्वारे मतदान कार्ड तयार करून मतदान करण्याच्या प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण त्या मतांनी मोठासा फरक पडत नाही. आपण या आधीच्या निवडणुकांवेळी सांगितले होते की ईव्हीएममध्ये फेरफार करता येतो व त्यामुळेच निवडणुकाही जिंकता येतात. ईव्हीएम द्वारे मोठ्या प्रमाणात मतांचा फेरफार करता येतो. त्यामुळेच अमेरिका व इतर विकसित देश तंत्रज्ञान असतानाही ईव्हीएम सारख्या मशीनचा वापर न करता मतपत्रिकेचा वापर करत आहेत.

ईव्हीएम हॅक होऊ शकते हे त्यांनाही माहित आहे. ईव्हीएम च्या वापरामुळे जो पक्ष सत्तेत आहे तोच सत्तेत कायम राहील. ईव्हीएम बंद करून मतपत्रिकेवर मतदान घेतल्यास बदल शक्य आहे. ईव्हीएम मध्ये मतदानानंतर येणारी पावती काही सेकंद दिसते पण त्यामुळे मत ज्याला घातलेले आहे त्यालाच मिळते हे मतदाराला स्पष्ट होत नाही. त्यामुळे मत घातल्यानंतर येणारे स्लिप मतदाराच्या हातात द्यावी व त्यानंतर ती दुसऱ्या बॉक्समध्ये जमा करावी असे झाल्यास या मतदानावर शंका उपस्थित होणार नाहीत असेही चर्चिल म्हणाले.

कुणाच्या खाण्याच्या आड येऊ नये !

फेस्त असतानाही मार्केटमध्ये बीफ उपलब्ध नाही यावर बोलताना चर्चिल म्हणाले की, काय खावे व काय खाऊ नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे हे स्वातंत्र्य घटनेने दिलेले आहे. खाणाऱ्यांना बिफ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. खाण्यासाठी बीफ उपलब्ध होत नसल्यास निर्यात करून पैसे कमावण्याचा प्रकार बंद व्हावा, असे ते म्हणाले.

हेही वाचा