मुंगूल हल्ला प्रकरण : दहाव्या संशयिताला फातोर्डा पोलिसांनी केली अटक

पर्वरी पोलिसांनी नेरूल येथून घेतले होते ताब्यात

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th August, 02:39 pm
मुंगूल हल्ला प्रकरण : दहाव्या संशयिताला फातोर्डा पोलिसांनी केली अटक

मडगाव : मुंगूल येथील हल्ला व गोळीबारप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी जॉयस्टन फर्नांडिस (२०) याला अटक करत कारही जप्त केली. ही या प्रकरणातील दहावी अटक आहे.

मुंगूल येथील गँगवॉरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर फातोर्डा पोलिसांनी गुरुवारी सुनील बिलावर (२०, रा. घोगळ, मडगाव) याला अटक केली होती. त्यानंतर आता पर्वरी पोलिसांनी या प्रकरणातील अन्य एक संशयित जॉयस्टन फर्नांडिस (२०) याला नेरुल येथून ताब्यात घेतले. संशयिताने गुन्ह्यात वापरलेली कारही जप्त करण्यात आली. तर यापूर्वी अटक केलेल्या आठजण पोलीस कोठडीत आहेत.

मुंगूल माडेल येथे गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत झालेल्या हल्ल्यात रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यावेळी गोळीबारही झाला. दक्षिण गोवा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात लुकआउट नोटीस काढली असून त्यातील अक्षय तलवार व राहुल तलवार हे अजूनही पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. यापूर्वी संशयित विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (रा. मडगाव), मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), मलिक शेख (१८), गौरांग कोरगावकर (२४) यांना अटक केली होती. आठही संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणात आणखीही काही अटक होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा