मडगाव : आगाळी फातोर्डा येथे पत्त्यांचा जुगार खेळणार्या तिघा संशयितांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७५४० रुपये व पत्ते जप्त करण्यात आले. प्रतिबंधात्मक अटकेनंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
फातोर्डा पोलिसांना आगाळी येथे पत्त्यांचा जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, शनिवारी रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित सुरेश नाईक (३२), लक्ष्मण लमाणी (३६) व किसर राठोड (३९) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर जुगार प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत कारवाई केली. जुगारासाठी वापरण्यात आलेले पत्ते व संशयितांकडून ७५४० रुपये जप्त करण्यात आले. अटकेनंतर जामिनावर संशयितांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी फातोर्डा पोलीस निरीक्षक नाथन आल्मेदा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष वेळीप पुढील तपास करीत आहेत.