वास्को : वेर्णा येथील गोवन महाराजा हॉटेलामागील एका अपार्टमेंटमध्ये राहणारे पेट्रिक अल्बर्ट (६४) हे मृतावस्थेत सापडले. याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी पंचनामा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रेंच नागरिकत्व असलेले पेट्रिक अल्बर्ट हे गेल्या तीन वर्षांपासून त्या अपार्टमेंटच्या एका सदनिकेत एकटेच राहत होते. त्यांनी आपल्या सेवेसाठी दोन केअरटेकर ठेवले होते. त्यापैकी एक केअरटेकर आपल्या कामाला आला असता, त्याला पेट्रिक हे कोणताही प्रतिसाद देत नसल्याच दिसून आले. त्यांनी याप्रकरणी इतरांना माहिती दिल्यावर १०८ रुग्णवाहिकेला बोलाविण्यात आले. त्यांना दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. ते नागोवा वेर्णा येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर होते. याप्रकरणी वेर्णा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.