म्हापशात अळंबी दाखल; ६०० रुपयांना २५ नग

वालपापडी महागली : कडधान्य, मासळीसह इतर भाज्यांचे दर स्थिर

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th July, 11:53 pm
म्हापशात अळंबी दाखल; ६०० रुपयांना २५ नग

म्हापसा : येथील बाजारात अळंबी दाखल झाली असून या अळंबीचा दर ६०० रुपये २५ नग असा आहे. तर भाजीपाल्यामध्ये वालपापडी वगळता इतर भाज्यांसह कडधान्य व मासळीचा दर गेल्या आठवड्याप्रमाणेच स्थिर आहे. वालपापडीचा भाव घाऊक बाजारात किलो मागे १२०, तर किरकोळ बाजारात १६० रुपये झाला आहे.
भाजीपाल्याचा घाऊक बाजार भाव प्रति किलोप्रमाणे टोमॅटो ३० रुपये, बटाटा ३० रुपये, कांदा ३० रुपये, गाजर ४० रुपये, वांगी ३० रुपये, ढब्बू मिरची ६० रुपये, कोबी ३० रुपये, कॉली प्लॉवर ३० रुपये, दुधी २० रुपये, काबूल (चिटकी) ४० रुपये, मिरची ७० रुपये, मडगड मिरची ७० रुपये, आले ८० रुपये, लसूण १०० रुपये, भेंडी ४० रुपये, लिंबू ५ रुपये नग, पालक १० रुपये मुळी, तांबडीभाजी १० रुपये मुळी, कोथिंबीर १० रुपये मुळी, शेपू २० रुपये मुळी, कांदा पात १० रुपये मुळी, मेथी १० रुपये मुळी, मका ४० रुपयांना तीन नग, कारले ३० रुपये, दोडगी ४० रुपये, बीट ४० रुपये, वालपापडी १२० रुपये, वाल ५० रुपये, काकडी ३० रुपये. नारळ ४० ते ६० रुपये.
तूरडाळ १२० ते १४० रुपये, चवळी १२० रुपये, मुग १२० रुपये, मसूर १०० रुपये, वाटाणे ८० रुपये, हिरवे वाटाणे १२० रुपये, हरभरे १०० रुपये, काबुल १४० रुपये, सोनामसुरी तांदूळ ५० रुपये, बासमती तांदूळ ८० ते १०० रुपये, गहू ४० रुपये, नासणे ५० रुपये, साखर ५० रुपये, चहा पावडर २८० रुपये, आटा ४५ रुपये, पाम तेल १३५ लिटर असा दर आहे.
फळांमध्ये सफरचंद २००-३०० रु., संत्रे २०० रु., मोसंबी २०० रु., पपई ६० रु. 


हेही वाचा