आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटी, वाढलेली लिव्हिंग डिमांड गोव्याला बनवतेय इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन!
पणजीः गोव्यात देशातीलच नव्हे तर विदेशात (एनआरआय) स्थायिक झालेल्यांकडूनही मोठी गुंतवणूक बांधकाम क्षेत्रात होत आहे. त्यामुळे गोवा हे 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन' बनले आहे. विशेषतः करोना लाटेनंतर वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे अनेकांनी गोव्यातील मालमत्ता खरेदीस प्राधान्य दिले आहे. मॅजिक ब्रीक्स या ऑनलाईन रिअल इस्टेट प्लॅटफॉर्मने गोव्यातील घरांचे दर ६६.३ टक्क्यांनी वाढल्याचे म्हटले आहे.
घर, जमीन खरेदीसह गोव्यातील शॉर्ट टर्म रेंटल मार्केट बहरले आहे. एका सर्व्हेनुसार, राज्यातील मालमत्तेच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली असून लक्झरी व्हिला आणि प्रीमियम अपार्टमेंट्सच्या मागणीतही तेजीने वाढ होत आहे. गोव्यात घरविक्रीच्या संख्येत ९.४३ एवढी वाढ झाली आहे. तसेच विक्रीमूल्यात १७ टक्के वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती ‘प्रॉपइक्विटी’ या रिअल इस्टेट डेटा अॅनालिटिक्स संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. दरम्यान, घरांच्या दरवाढीत पर्वरी ५१.६९ टक्के घेऊन आघाडीवर आहे. कांदोळी ४२.७९ टक्के, तर करंजाळे ९ टक्के आहे.
दक्षिण गोव्यातील दाबोळी आणि उत्तर गोव्यातील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच गोवा-मुंबई महामार्गाचा विस्तार यामुळे प्रवासाचा बराचसा वेळ कमी झाला आहे. साधनसुविधा वाढल्यामुळे गोव्यात मालमत्तांचे दरही गगनाला भीडले आहेत. गेल्या वर्षभरात गोव्यातील घरांच्या किमतींमध्ये तब्बल ६६.३ टक्क्यांची वाढ झाल्याचे सर्वे अहवालांमध्ये नमूद केले आहे. तर लक्झरी व्हिलांच्या किंमतींमध्ये २५ ते ३० टक्के वाढ झाली आहे.
गोव्यात मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनी सध्या आपला मुक्काम ठोकला आहे. गोव्यातील बहुतांश बांधकाम कंपन्यांनी स्थानिकांना किंवा सेकंंड होम शोधणाऱ्यांना घरे मिळतील अशा पद्धतीनेच घरे उपलब्ध करण्यावर भर दिला आहे त्यामुळे गोव्याबाहेरील मोठमोठ्या बांधकाम कंपन्यांनी जगभरातील ग्राहकांना गोव्याकडे आकर्षित प्रयत्न चालवले आहेत. यात स्पर्धा वाढली असून गोव्यात घरांच्या किंमतीही वाढल्या आहेत.
गोव्यातील सध्याचे सुरू असलेले दर (प्रति चौमी.)
पर्वरी- रु. १ लाख ते १.२५ लाख,
म्हापसा - ४५ हजार ते ५० हजार
पणजी - १ लाख ते १.५० लाख
मडगाव - ६० हजार ते ६५ हजार